Kolhapur Police : ‘मर्डर निश्चित २०२५’, असा मोबाईलवर स्टेटस ठेवला अन् पोलिसांनी कोल्हापुरातील घिसाड गल्लीच्या पोरांना असला चोपला की परत...

Mobile Whats Up Status : मोबाईलवर ‘मर्डर निश्चित २०२५’ आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी घिसाड गल्ली, रंकाळा टॉवर परिसर आणि कसबा बावडा येथील सहा तरुणांच्या टोळक्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
Kolhapur Police

पोलिसी खाक्या दाखवत ताराबाई पार्क येथील एका महाविद्यालय परिसरात फिरवले. तसेच उठाबशाही काढायला लावल्या.

esakal

Updated on

WhatsApp Status News : विशाल ऊर्फ सर्किट अनिल साळुंखे (वय ३३, रा. महाराणा प्रताप चौक), ओमकार दादा साबळे (२३, भाजी मंडई कसबा बावडा), रूपेश सुनील काशीद (२६, रा. कृष्णानंद कॉलनी, कसबा बावडा), भार्गव राहुल भोसले (२२, रा. रंकाळा टॉवर), वैभव विष्णू सूर्यवंशी (वय २९, रा. शाहू मिल चौक), आर्यन दीपक मोरे (१९, रा. संकपाळनगर, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत ताराबाई पार्क येथील एका महाविद्यालय परिसरात फिरवले. तसेच उठाबशाही काढायला लावल्या. त्यानंतर या तरुणांनी असा आगाऊपणा करणार नसल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com