

कोल्हापूरच्या राजकारणात ताप वाढत असताना हसन मुश्रीफ यांनी बंडखोरांना ठणकावून इशारा दिला. संजय मंडलिकांच्या पॅनेलबाबतही त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.
esakal
Kolhapur Kagal Politics : (नरेंद्र बोते), राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडी यांच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ कागल शहरातील गैबी चौकात जाहीर सभेच्या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, अखिलेशराजे घाटगे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, एम. पी. पाटील, अमरसिंह घोरपडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.