

हुपरी नगरपालिकेत चिन्ह वाटपावरून मोठा गोंधळ, शिट्टी चिन्हावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोळ घातल्याचा आरोप
esakal
Kolhapur Hupari Municipal Council : हुपरी येथील नगरपालिका निवडणुकीत चिन्ह वाटपावेळी मिळालेले शिट्टी हे चिन्ह बदलून छत्री चिन्ह देण्याच्या निर्णयावरून निवडणूक अधिकारी व मनसे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आघाडी उमेदवारांत जोरदार खडाजंगी झाली. संतप्त उमेदवार व कार्यकर्त्यांनी राजकीय दबावातून चिन्ह बदलल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यालयात ठाण मांडले. अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावास पोलिसांनी आपला खाक्या दाखवत पांगवले. यावेळी मोठा गोंधळ उडाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.