

कोल्हापूर–पुणे प्रवासाचा त्रास वाढला! अवघ्या तीन तासांचा प्रवास तब्बल बारा तासांचा झाला
esakal
Kolhapur Pune Highway Traffic : राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. ठिकाठिकाणी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांसाठी डायव्हर्शन वाढले आहे. या सर्वांमुळे कोल्हापूर - पुणे या शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. शनिवारी आणि रविवारी महामार्गावर वाहतूक चांगलीच रेंगाळली होती. त्यामुळे पाच तासांचे अंतर पार करण्यासाठी तब्बल बारा तास लागले. याचा त्रास वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला.