
Kolhapur Rain Alert : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने अनेक मार्ग बंद झाले आहे. विशेषत: कोकणात जाणाऱ्या कोल्हापूर -गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आला आहे. अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. आज दुपार पर्यंत घाट वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यातील ६५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पाणी पातळी ३५ फुटांवर गेली आहे.