

राधानगरी : तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांतील सर्वाधिक पाऊस राधानगरी धरण क्षेत्रावर २११ मिलिमीटर नोंदला आहे, तर आज सायंकाळी चारपर्यंतच्या आठ तासांत ७० मिलिमीटर पाऊस झाला. पाणी पातळी वाढ असल्याने धरणातून वीजनिर्मितीसाठी सध्या १४०० क्युसेक पाणी भोगावती नदीपत्रात सुरूच आहे. हे धरण सायंकाळपर्यंत ७.०८ टीएमसी म्हणजे ८५ टक्के भरले आहे.
गेल्या २४ तासांत तालुक्यातील तुळशी धरण क्षेत्रावर १०८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली, तर आठ तासांत ८० मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे हे धरण १.५१ टीएमसी म्हणजे ४३.५० टक्के इतके भरले आहे. काळम्मावाडी धरण स्थळावर १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे धरण ११.३० टीएमसी म्हणजे ४४.५० टक्के इतके भरले आहे.
राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेक सुरू आहे. आजही पावसाचा जोर कायम असून, धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला राधानगरी धरण ७५ टक्के इतके भरले होते. आज ते केवळ आठ दिवसांच्या धुवॉंधार पावसामुळे ८५ टक्के इतके भरले आहे. चार-पाच दिवसांतील पावसामुळे दोन टीएमसी पाणीसाठा गतीने वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सहा टक्के अधिक पाणीसाठा झाला असून पावसाचा वेग असाच राहिल्यास धरण गतीने भरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.