

Kolhapur–Ratnagiri Highway trcuk fire
esakal
Traffic jam Kolhapur Ratnagiri highway : (राजेंद्र दळवी) : कोल्हापूर -रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरील वाघबीळ घाट येथे आज (ता.२६) गुरुवारी सकाळी सुमारे सव्वा आठच्या सुमारास शासकीय धान्याने भरलेल्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ रत्नागिरी महामार्ग वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.