esakal | कोल्हापूर: शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करा
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कोल्हापूर: शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करा

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर: शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपातीच्या आदेशाची शाळांनी अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना निवेदनाद्वारे आज केली.

हेही वाचा: कोल्हापूर: मेघोली फुटल्याने वेदगंगाच्या पातळीत ४ फुटांनी वाढ

निवेदनात म्हटले आहे की, दीड वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावहारिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी शासनाने शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात माफीचा आदेश काढला. त्याची प्रत्यक्षात कोणत्याही शाळा अमंलबजावणी करताना दिसत नाही. सामान्य पालकांची आर्थिक कुचबंणा होत आहे. एक रकमी शुल्क ताबडतोब भरण्यासाठी शाळा पालकांना, विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत.

त्यामुळे शुल्क कपातीची निव्वळ घोषणा करुन पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे. शाळा शासन आदेशाची अंमलबजावणी करत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी. शिष्टमंडळात अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, अनिल पाटील, राजू मालेकर, विलास भोंगाळे, रमाकांत आंग्रे, विनोद डूणंग, राजेश वरक यांचा समावेश होता.

हेही वाचा: मेघोली Impact: वेदगंगेच्या पाणी पातळीत 5 फुटांनी वाढ

शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना १५ टक्के शुल्क माफी आदेशाची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची त्वरित खात्री केली जाईल. ज्या संस्थेने आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. शाळा शाळा शुल्कासाठी वेठीस धरत असल्यास पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहायक शिक्षण संचालक चौगुले यांनी केले.

loading image
go to top