
"Earth’s shadow covering the moon during the total lunar eclipse, visible from Kolhapur."
Sakal
कोल्हापूर: सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येऊन पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्र झाकला जातो. यालाच खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. आज रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. पहाटे एक वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण पूर्ण झाले. भारतासह आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथेही हे ग्रहण दिसले. शहरात काही खगोल अभ्यासकांनी विद्यार्थी आणि नागरिकांना दुर्बिणीतून ग्रहण प्रत्यक्ष दाखवले आणि त्याची माहिती दिली. अंबाबाई मंदिरातही देवीच्या उत्सव मूर्तीला अखंड जलाभिषेक करण्यात आला.