Kolhapur : बाजूपट्ट्या ठरताहेत अपघातास कारण

कोल्हापूर-कंदलगाव मार्ग; कामगारांचा अभाव, रस्ता डागडुजीची कामेही रखडली
Kolhapur
Kolhapur sakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्द सोडताच उपनगरे, गावांना जोडणारे रस्ते हे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली आहेत. यात रस्त्यांवरील खड्डे भरणे, डागडुजी करणे, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी चरी मारणे, बाजूपट्टी स्वच्छ राखणे, गतिरोधक, मार्गदर्शक, दिशादर्शक फलक लावणे अशी रस्ता डागडुजीची कामे मैलकुली कामगार करतात. मात्र, पाच-सहा वर्षांपासून विभागाकडे मैलकुली नसल्याने विभागाच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्याच्या बाजूपट्ट्या सध्या अपघातास कारण बनत असल्याचे चित्र कोल्हापूर-कंदलगाव रस्त्यावर दिसत आहे. आर. के. नगर खडीच्या गणपती मंदिरासमोरील चढतीवरील वळण बाजूपट्टीवर वाढलेल्या गवतामुळे धोकादायक ठरत असून, यामुळे अपघात होत आहेत. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

रस्ते चकाचक, बाजूपट्टीकडे दुर्लक्ष...

दक्षिण परिसरातील उपनगरे, गावांचा विचार केला, तर येथील रस्ते चांगले असल्याचे पहावयास मिळते. मात्र बाजू पट्ट्यावर गवत, काटेरी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे रस्ते धोकादायक बनले आहेत.

ग्रामपंचायतीची मनधरणी...

जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे सध्या मैलकुली नसल्याने शहराशेजारील पाचगाव, मोरेवाडी, कंदलगावसह इतर गावांतील मुख्य रस्त्यांची डागडुजी, स्वच्छता रखडली आहे. या स्वच्छतेसाठी स्थानिक ग्रामपंचायतींना विनवणी करण्याची वेळ आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur illegal abortion investigation
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com