कोल्हापुरातील रस्ते बादचं!
esakal
कोल्हापूर
Kolhapur Roads : कोल्हापुरातील रस्ते बादचं! सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका; ७७ रस्त्यांच्या सर्व्हेद्वारे २३९ पानी मुद्दे
Circuit Bench Kolhapur : कोल्हापुरातील रस्त्यांची दयनीय अवस्था उघड! सर्किट बेंचमध्ये दाखल जनहित याचिकेत ७७ रस्त्यांच्या सर्व्हेद्वारे तब्बल २३९ मुद्दे मांडण्यात आले असून तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Kolhapur Roads In Poor Condition : कोल्हापुरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका शुक्रवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आली. उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार, ॲड. सुनीता जाधव, प्रा. डॉ. तेजस्विनी देसाई आदींनी शहरातील प्रमुख ७७ रस्त्यांचा सर्व्हे करून साधारण २३९ पानांची ही याचिका दाखल केली आहे. ॲड. असिम सरोदे यांच्याकडून ही याचिका डिव्हीजनल बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्याकडे दाखल झाल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.