
RTO Number Manipulation : वाहनांना फॅन्सी क्रमांक मिळण्यासाठी लाखो रुपये मोजणाऱ्या कोल्हापूरमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गैरप्रकार झाल्याचे ऑनलाईनवर दिसून येते. सध्या ‘एम एच ०९ एचए’ ही दुचाकीची सीरियल सुरू आहे. तरीही पुढील ‘एम एच ०९ एचबी’ ही सीरियल सुरू केली. त्यामधील ‘९००’ हा एकच क्रमांक गायब करून ती पुन्हा बंद केली आहे. हा गैरप्रकार आहे. हे करणारा झारीतील शुक्राचार्य कोण? याचा तपास होऊन ९०० क्रमांक कोणाला दिला, का दिला, इतरांना असे क्रमांक का दिले जात नाहीत, याची चौकशी होणे गरजेचे आहे.