Kolhapur Maternal Death : आंतरजातीय प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी शेवट! आठव्या महिन्यात सिझेरियन, बाळाला जन्म देताच काही क्षणांतच आईने सोडला प्राण

21-Year-Old Mother Dies Shortly After Delivery in Kolhapur : साके येथील २१ वर्षीय शीतल म्हातुगडे यांनी आठव्या महिन्यात सिझेरियनद्वारे मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर प्रकृती अचानक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
woman dies shortly after delivery in Kagal

woman dies shortly after delivery in Kagal

esakal

Updated on

म्हाकवे (जि. कोल्हापूर) : साके (ता. कागल) येथील शीतल शिवाजी म्हातुगडे (वय २१) या मातेचा प्रसूतीनंतर काही वेळातच मृत्यू झाल्याने म्हातुगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला (woman dies shortly after delivery in Kagal) आहे. ज्या क्षणी घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचा जल्लोष सुरू झाला, त्याच क्षणी शीतल यांच्या मृत्यूने काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली. एका बाजूला बाप होण्याचा आनंद, तर दुसऱ्याच क्षणी पत्नीला गमावण्याचे दुःख, अशा नियतीच्या क्रूर खेळाने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकही हळहळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com