
कोल्हापूर सांगलीच्या शेतमालासाठी विशेष रेल्वे डबा
esakal
ठळक मुद्दे, (Highlight)
मिरज ते दिल्ली अंतर ः सुमारे १८०० किलोमीटर
रेल्वे प्रवासाचा वेळ ः २५ तास, ३५ मिनिटे, ट्रक प्रवासाचा वेळ ः सलग प्रवास केल्यास २७ तास
रेल्वेचा फायदा ः वातानुकूलित बोगीतून ताजा शेतमाल पोहोचवणे शक्य
Special Railway Coach : अजित झळके : सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत पिकणारी फळे आणि भाजीपाला कमी वाहतूक खर्चात आणि अधिक गतीने मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे. मिरज ते दिल्ली आणि मिरज ते मुंबई रेल्वे गाड्यांना एक स्वतंत्र फळ व भाजीपाला वाहतुकीचा डबा जोडावा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.