
Almatti Dam Height : केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे भद्रा अप्पर नदी प्रकल्पासाठी केंद्राने ५,३०० कोटी त्वरित मंजूर करावेत. कृष्णा लवादाचा निकाल लवकरच अधिसूचित करावा. कर्नाटक सरकार निर्णयानुसार आपल्या वाट्याचे पाणी अडवणार आहे. आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासह राज्यातील इतर प्रकल्प राबविण्यास कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार केला.