
Kolhapur Shahi Dussehra
esakal
ठळक मुद्दे (Highlights)
अडीचशे वर्षांची परंपरा – करवीर संस्थानचा शाही दसरा (सीमोल्लंघन) सोहळा अडीचशे वर्षांहून जुना असून, राजर्षी शाहू महाराजांनी या सोहळ्याला वैभव प्राप्त करून दिले.
छबिना मिरवणुकीचे वैभव – पूर्वी शाही हत्ती, घोडेस्वार, शिकारी प्राणी, तोफा या भव्यतेसह निघणाऱ्या छबिना मिरवणुकीत आज मेबॅक मोटार आणि पोलिस दलाची सलामी असली तरी परंपरा आजही कायम आहे.
लकडकोटावरील आपट्याची पूजा – छत्रपती महाराजांच्या हस्ते लकडकोटावर आपट्याचे पूजन झाल्यानंतरच सीमोल्लंघन सोहळा पूर्णत्वास जातो.
Kolhapur Shahi Dussehra 250 Year : नंदिनी नरेवाडी : करवीर संस्थानच्या शाही दसरा (सीमोल्लंघन) सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. करवीर छत्रपतींची राजधानी कोल्हापूरमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या शाही दसरा महोत्सवास जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र, हा शाही दसरा सोहळा नावारूपास आला, तो राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात. शाहू महाराजांनी या सोहळ्याला एक वेगळेच वैभव प्राप्त करून दिले. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या दसरा चौकात हा सोहळा सजतो. दसरा सोहळ्यासाठी जी मिरवणूक निघते, त्या मिरवणुकीस ‘छबिना मिरवणूक’ म्हणून ओळखले जाते.