Shahi Dussehra Reels : कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचे रील्स, युट्यूब शॉर्ट्स बनवा अन् हजारो कमवा, प्रशासनाचा उपक्रम; जाणून घ्या नियम

Kolhapur Shahi Dussehra : ‘शाही दसरा महोत्सव 2025’ अंतर्गत कोल्हापूर प्राईड रील्स, युट्यूब शॉर्ट्स व युट्यूब व्हिडिओ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
Shahi Dussehra Reels

Shahi Dussehra Reels

esakal

Updated on
Summary

शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा:

कोल्हापूरच्या ‘शाही दसरा महोत्सव 2025’ ला यंदा प्रथमच राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला असून, भारत सरकार, पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवले जात आहेत.

व्हिडिओ/रील्स स्पर्धेचे आयोजन:

कोल्हापूर प्राईड रील्स, YouTube व्हिडिओ स्पर्धेत कोल्हापूरच्या गडकिल्ले, मंदिरे, वारसा स्थळे, निसर्गसंपदा, कला, खाद्यसंस्कृती, पारंपरिक यात्रा-जत्रा यासारख्या विषयांवर रील्स किंवा व्हिडिओ तयार करता येणार आहेत. सहभागासाठी 6 ऑक्टोबर 2025, रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल.

नियम व पारितोषिके:

वय 15 वर्षांवरील स्पर्धकांना प्रवेश असून, व्हिडिओ किमान 2 मिनिटांचा, Public स्वरूपात YouTube वर अपलोड करणे अनिवार्य आहे. शीर्षकात #ShahiDasaraMahotsav2025 असणे गरजेचे. पारितोषिकांमध्ये ₹7,000 (प्रथम), ₹5,000 (द्वितीय), ₹3,000 (तृतीय) तसेच प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ ₹1,000 अशी रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आहेत.

Kolhapur Shahi Dussehra Reels : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला यावर्षी प्रथमच राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार, पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाही दसरा महोत्सव 2025’ अंतर्गत कोल्हापूर प्राईड रील्स, युट्यूब शॉर्ट्स व युट्यूब व्हिडिओ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क असून 6 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सहभाग नोंदविता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com