

एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा
esakal
Kolhapur Mpsc : एमपीएससीच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्याचा डंका वाजला आहे. कसबा बावड्याची सायलीने राज्यात दुसरे स्थान पटकावले तर इचलकरंजीचा तन्मय मांडरेकर सातव्या क्रमांकावर. जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत कसबा बावड्याची कन्या सायली किरण भोसले यांनी मागासवर्गीय प्रवर्गात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. इचलकरंजीतील तन्मय अनिल मांडरेकर राज्यात सातवे आले, तर सूरज देबाजे यांने अठ्ठावीसावी रँक मिळविली.