

Shiv Jayanti celebration controversy Kolhapur
esakal
Kolhapur Silencer removed bike stunt : कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना जिल्ह्यातील काही भागांत अतिउत्साही तरुणांकडून हुल्लडबाजीने नागरिकांना त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. दुचाकींचे सायलेंसर काढून कर्णकर्कश आवाज करत रस्त्यांवरून फेऱ्या मारणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे तसेच सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ प्रसारित करणे, असे प्रकार दिवसभर सुरू असल्याचे दिसून आले.