

kolhapur Shivaji Peth violence today
esakal
Kolhapur Crime News : कोल्हापूर शहराचे लक्ष लागून राहिलेल्या इंद्रजित बोंद्रेविरुद्ध शिवतेज खराडे लढतीच्या निकालानंतर आज शिवाजी पेठेत याचे पडसाद उमटले. विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्याने धुमश्चक्री उडाली. मर्दानी खेळाचा आखाडा येथे सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या दगडफेकीत माजी महापौर सई खराडे, अजित खराडे यांच्यासह बोंद्रे गटातील तिघे जखमी झाले. दोन घरांची तोडफोड झाली. जीपसह चार वाहनांचे नुकसान झाले. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात आहे.