
Kolhapur Crime
esakal
Morning Walk Robbery : मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याचे लागोपाठ तीन प्रकार आज सकाळी घडले. तीन महिलांचे मणीमंगळसूत्र, बांगडी असा अडीच तोळ्यांचा ऐवज चोरून नेण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. पुईखडी परिसरात मागील आठवड्यातही असाच प्रकार घडला असून, चारही चोरीतील चोरटे एकच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.