
लगोरीने काच फोडून मोटारीतील ऐवज पळविला
esakal
ठळक मुद्दे (Highlight Summary Points):
लगोरीने फोडली काच, मिनिटांत चोरी:
चोरट्याने लगोरीचा वापर करून मोटारीची काच फोडली व बॅगमधील रोकड, इअर पॉड आणि चार्जर असा ऐवज घेऊन पसार झाला.
सीसीटीव्हीत कैद संपूर्ण प्रकार:
चोरटा प्रथम निरीक्षण करून निघून गेला, नंतर परत येऊन बॅग उचलताना कॅमेऱ्यात दिसला; पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे.
परराज्यातील टोळ्यांचा संशय:
पोलिस तपासात चोरटे रेल्वेने कोल्हापुरात येतात, चोरी करून कपडे बदलून पुन्हा रेल्वेने परत जातात, अशी माहिती पुढे आली आहे.
Kolhapur Crime News : लगोरीच्या सहाय्याने वकिलाच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी एक लाखांची रोकड आणि इअर पॉड, चार्जर असा सुमारे १ लाख १६ हजार २०० रुपयांचा ऐवज पळविला. व्हिनस कॉर्नर येथील एका ज्वेलर्स दुकानाजवळील रस्त्याच्या बाजूला मोटार उभी केली असताना शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
याची फिर्याद ॲड. गौरव सुनील चांडोले (मूळ सांगोला, जि. सोलापूर, सध्या जिवबानाना जाधव पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.पोलिसांनी आणि फिर्यादी यांनी सांगितले की, फिर्यादी ॲड. चांडोले यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी रोख एक लाख रुपये आणले होते. ते लॉक केलेल्या मोटारीत ठेवले होते.