
Kolhapur Open Drain Death
esakal
फुलेवाडी रिंगरोड परिसरातील खुल्या गटारीतून छोटा भाऊ वाहून गेल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या केदार कांबळे (वय ११) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.
भागात रस्ते अरुंद, गटारी उघड्या व पावसाळ्यात ओसंडून वाहत असल्याने स्थानिक रहिवाशांनी गटारी बंदिस्त करण्याची मागणी केली आहे.
केदार आपल्या शाळेच्या कार्यक्रमात सकाळी सहभागी झाला होता; भावाला वाचवताना त्याने स्वतःचा जीव पणाला लावला.
Kolhapur Municipal News : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील दत्त कॉलनी, चिंतामणी कॉलनी, अहिल्यादेवी होळकर नगरात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. रस्ते अरूंद असून त्याहून गटारींची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यात या गटारी ओसंडून वाहत असल्याने वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांनाही अंदाज येत नाही. शनिवारी सायंकाळी अशाच खुल्या गटारीतून सख्खे भाऊ वाहून गेल्याची घटना घडली. दुर्दैवाने छोट्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात केदार कांबळे (वय ११) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. भागातील खुल्या गटारी ताबडतोब बंदिस्त कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतून होऊ लागली आहे.