

अपघातानंतर चालकाचा ट्रॅक्टर जवळच्याच विद्युत खांबाला धडकला. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
esakal
Kolhapur Accident News : कोल्हापुरातील भर वस्तीत हात सोडून ट्रॅक्टर चालवणाऱ्या मद्यधुंद चालकाच्या विकृत कृत्यामुळे एका वृद्ध महिलेच्या जीवावर बेतण्यासारखी गंभीर दुर्घटना. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव सुशीला बळवंत गुरव असे असून त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.