
कोल्हापुरात एकाच वेळी सहा महिलांनी नस कापून घेतली प्रकरणात नवी अपडेट समोर
esakal
Kolhapur Crime News : कसबा बावड्यातील शासकीय महिला वसतिगृहात सहा पीडित महिलांनी सामुदायिकरीत्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला. जखमी महिलांनी लोखंडी पट्टीने हातावर जखमी करून घेतल्याचे समोर आले. घटनेची चौकशी करून त्याचा अहवालही आज न्यायालयात सादर करण्यात आला. याची सुनावणी ३० ऑक्टोबरला होईल. सहाही जखमी महिलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.