
Kolhapur Slab Collapse
esakal
ठळक मुद्दे (Highlights) :
आई-मुलाचे हृदयद्रावक क्षण – जया शेंबडे या आपल्या मुलाबद्दल हवालदिल होत्या; "माझ्या पोराला आत का न्हेलं?" असे म्हणत त्या रडू लागल्या. अखेर त्यांचा मुलगा दत्ता स्वतः चालत बाहेर आला आणि त्याने "आई रडू नकोस" म्हणत धीर दिला.
सीपीआरमध्ये भीतीचे वातावरण – सिमेंटच्या धुळीत माखलेल्या महिला कामगार सीपीआरमध्ये आल्या. रुग्णवाहिकेचा आवाज ऐकूनही त्या दचकत होत्या. जखमी बाहेर आल्यावरच त्यांच्या जीवात जीव आला.
अफवा आणि गोंधळ – ढिगाऱ्याखाली अजून एक गमबूट दिसल्याची माहिती मिळताच मुकादमांची धावपळ सुरू झाली. मात्र सर्वजण सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतरच तणाव निवळला.
Kolhapur Accident News : ‘माझ्या पोराला आत का न्हेलं?, त्याचा हात का हालत नाही,’ असे विचारत जया शेंबडे रडू लागल्या. सोबतच्या कामगार महिला त्यांना धीर देत होत्या. बराच वेळ झाला तरी त्यांना आपल्या मुलाचे काय झाले हे कळाले नव्हते. अचानक त्यांनी हंबरडा फोडला. इतक्यात दत्ता स्वतः चालत बाहेर आला. त्याला पाहताच जया त्याला बिलगल्या. ‘आई रडू नकोस. मला काय झालं न्हाई,’ असे शब्द ऐकताच जया यांना धीर आला. दुःख, भीतीचे वातावरण सीपीआरमध्ये पसरले होते. अचानक घडलेल्या या घटनेने महिला कामगार घाबरून गेल्या होत्या. रुग्णवाहिकेचा आवाज जरी झाला तरी त्या दचकत होत्या. जखमींना शस्त्रक्रिया विभागातून बाहेर आणल्यावर त्या महिलांच्या जीवात जीव आला.