

कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना चांगले दर दिले आहेत.
esakal
Sangli Kolhapur Sugarcane News : कोल्हापूर जिल्ह्यातील डी. वाय. पाटील साखर कारखान्याने चालू वर्षी गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३४५० रुपयांची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. गगनबावड्यासारख्या डोंगराळ भागात असणाऱ्या साखर कारखान्याने पहिल्या उचलीची घोषणा ३४५० केली असेल तर सांगली जिल्ह्यातील साखर करखान्यांना ते का जमत नाही, असा सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.