

कोल्हापुरात ऊसदर वाढीच्या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे. शिरोळ तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी ऊस वाहतुकीची तीन वाहने पेटवली...
esakal
Kolhapur Sugarcane Protest : शिरोळ तालुक्यात ऊसदराचे आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) जवळ ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अनोळखींनी पेटवून दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (ता. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर आंदोलक घटनास्थळावरून पसार झाले.