TET paper Leak
sakal
कोल्हापूर
Kolhapur: ‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणी पाच शिक्षकांसह 9 जणांना अटक, असा उधळला कट
TET paper Leak: टीईटी’ पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल केला असून, मुख्य सूत्रधाराचा भाऊ संदीप भगवान गायकवाड (रा. सातारा) याच्यासह नऊ जणांना अटक केली; तर ९ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सेवेतील पाच शिक्षकांचा समावेश आहे.
मुरगूड, कोल्हापूर: महाराष्ट्रात सर्वत्र आज शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू असतानाच शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा मुरगूड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सोनगे (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे पहाटे छापा टाकून पर्दाफाश केला.

