Kolhapur : सायंकाळी सहानंतर घराचे दरवाजे बंद

कापशी येथे डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष
Kolhapur
Kolhapur esakal

कापशी : कापशी रोड गावात मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैरान असून, सहा वाजतानंतर डास घरात येऊ नय म्हणून गृहिणींना घराचा तर व्यावसायिकांना दुकानाचा दरवाजा बंद करावा लागत असल्याने ही समस्या किती गंभीर झाली याचा प्रत्यय येतो.

Kolhapur
Beauty Tips : गुलाबाची लाली गालावर उतरवण्याचा सोप्पा फॉर्म्युला, हिवाळ्यात हे फेसमास्क नक्की वापरा

ग्रामपंचायत प्रशासनातर्फे गेले कित्येक वर्षांपासून एकदाही डास निर्मूलन फवारणी करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करत आहेत. गेले सहा महिन्यांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे. अस्वच्छ परिसर डबके, सांडपाण्याच्या नाला तुबल्याने डासांची उत्पत्ती झपाट्याने होत आहे. सकाळी किंवा दुपारी डासांचे प्रमाण कमी असते; पण जशी संध्याकाळी सहा वाजले की डास घरे व दुकानात प्रवेश करतात.

Kolhapur
Car Tips for Winter : गाडीच्या काचेवर वारंवार येतोय फॉग? 'या' टिप्सचा होईल फायदा

त्यामुळे गृहिणी घरे व व्यावसायिक दुकान काही वेळेसाठी बंद करुन डास प्रतिबंधक साधनाचा वापर करावा लागतो डास चावल्याने डेंगी, चिकणगुन्या, सामान्य ताप, अंगावर पुरळ येत खाज सुटणे, मलेरीया टायफाईड यासारखे अंगदुखी यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. wयाबाबत ग्रामपंचायत प्रशासन ठिम्म असून डास निर्मूलन करण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलतांना दिसून येत नाही.

Kolhapur
Hygiene Tips For Women : प्रत्येक महिलेला शारीरिक स्वच्छतेच्या या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!

सायंकाळी सहा वाजतानंतर गावात सर्वत्र डासांचे प्रमाण फार वाढते. त्यामुळे घर दुकानात डास प्रतिबंधक कॉईल, लिक्वीड यासह इलेक्ट्रॉनिक बॅटचा आधार घ्यावा लागतो डास चावल्याने लहानबालक यासह अबालवृध्द आणि नागरिकांना साथीच्या रोगांना तोड द्यावे लागते डास माशा निर्मुलनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

- संजय केवट, व्यावसायिक, कापशी रोड

Kolhapur
Hygiene Tips For Women : प्रत्येक महिलेला शारीरिक स्वच्छतेच्या या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!

गावात डासांचे प्रमाण वाढले असून, संध्याकाळी घरी आणि अंगणात बसने कठीण होत आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देऊन डास निर्मूलन फवारणी करण्यात यावी.

- राजेश डोंगरे, माजी सरपंच, कापशी रोड

ग्रामपंचायत कापशी रोड गावात डासांचे प्रमाण वाढले असल्याचे समजते. तरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नादुरुस्त असलेली फवारणी यंत्र दुरुस्ती करून फवारणी करण्यात येणार आहे.

- उज्ज्वला थिटे, सचिव, ग्रामपंचायत कापशी रोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com