

प्रसूतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे आईचा मृत्यू; तीन दिवसांचे बाळ आईविना पोरके झाले.
esakal
Kolhapur Hospital Tragedy : तपोवन परिसरात राहणाऱ्या जाधव कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाची लगबग सुरू होती. दुधाळी येथील आजोळी चिमुकल्या पावलांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. जाधव आणि जरग कुटुंबीयांना नातू झाल्याचा मोठा आनंद झाला. पण, आई शिवानी (वय २५) हिला चक्कर आल्याचे निमित्त झाले अन् एका क्षणात आनंद सोहळ्याचे रूपांतर शोकसागरात झाले.