
Kolhapur Film Production
esakal
Kolhapur Cinema Development :‘कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणपूरक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. येत्या महिन्याभरात आणखी १० ते १५ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे देशातील चित्रपट निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून कोल्हापूरच्या चित्रनगरीची ओळख जगभरात व्हावी, अशा सुविधा येथे करण्यात येतील,’ अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अशीष शेलार यांनी आज येथे केली.