कोल्हापूर : किराणा, धान्य, फळे, सराफ आदी व्यापारी-व्यावसायिकांनी आज दुकाने, शोरूम बंद ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकर आकारणीला (मार्केट सेस) तीव्र विरोध दर्शविला. .मार्केट सेस रद्द करण्यासह विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. बंदमुळे सुमारे ३५० कोटींची उलाढाल ठप्प झाली. मार्केट सेसविरोधात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यामध्ये बदल करावा, यासाठी राज्य व्यापारी कृती समितीने पुकारलेल्या व्यापार बंदमध्ये कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिक सहभागी झाले. .Kolhapur Traders : मार्केट सेस रद्द करण्यासाठी कोल्हापूर बंदची हाक; व्यापाऱ्यांचा निर्धार आणि शासनाला दिलेला ठाम इशारा!.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन आणि सर्व संलग्न व्यापारी संघटनांतर्फे सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली.. ‘मार्केट सेस रद्द करा’, ‘जीएसटी कायदा सुटसुटीत करा’ या आशयाचे फलक घेऊन पदाधिकारी, प्रतिनिधींनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर तहसीलदार (गृह शाखा) स्वप्नील पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले..राष्ट्रीय बाजार समिती कायद्याविरोधात एपीएमसी मार्केट बंद.चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, ‘‘सध्या सर्व कृषी उत्पन्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो. त्यावर पुन्हा बाजार समित्यांकडून आकारले जाणारे बाजार शुल्क अशी दुहेरी कर आकारणी अन्यायकारक आहे. या विरोधातील आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे. .सरकारने सेस रद्द केला नाही, तर बेमुदत बंद आंदोलन करू. माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीप कापडिया, धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधीक्षक उदय उलपे यांना निवेदन दिले. .बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांना जीएसटी असताना मार्केट सेसची वसुली का, अशी विचारणा केली. त्यावर दळवी यांनी मार्केट सेसबाबत समिती गठित करून संचालक मंडळासोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असे सांगितले. यावेळी राजू पाटील, भरत ओसवाल, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, विजय कागले, श्रीनिवास मिठारी, अमर क्षीरसागर, विवेक नष्टे, धन्यकुमार चव्हाण, धर्मेंद्र नष्टे, किरण तपकिरे, रहीम बागवान, नईम बागवान, विजय हावळ, संपत पाटील, सचिन शानबाग, नीलेश पटेल, जयेश ओसवाल, रमेश कारवेकर, रणजित पारेख, अनिल धडाम, शिवाजीराव पोवार, अरुण सावंत, अविनाश नासिपुडे, तौफिक मुल्लाणी, अॅड. इंद्रजित चव्हाण, सचिन पाटील उपस्थित होते..चौकट...अन्यथा परवाने नूतनीकरण करणार नाहीअन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवरील जीएसटीचा राजस्व शासनाला मिळत आहे. त्यामुळे मार्केट सेस रद्द करावा. २६ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या चर्चेमध्ये अनिर्णित विषयांवर पुन्हा त्वरित बैठक घेऊन निर्णय घ्यावेत. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यांमधील बदलांबाबत कृती समितीसमवेत चर्चा करून निर्णय घ्यावेत, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यामधील जाचक तरतुदी रद्द कराव्यात, अनुचित कारवाईस प्रतिबंध करावा, यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा व्यापारी परवाने नूतनीकरण करणार नाहीत, असा इशारा निवेदनाद्वारे आंदोलनकर्त्यांनी दिला..धान्य ते सराफ व्यापारात शुकशुकाटकोल्हापूर चेंबर, ग्रेन मर्चंटस्, भाजीपाला-फळ मार्केट, सराफ आणि कापड व्यापारी संघ, हॉटेल मालक संघ, शाहूपुरी मर्चंटस्, राजारामपुरी व्यापारी इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स, फूटवेअर्स, पानपट्टी, नारळ व्यापारी आदी संघटनांचे पदाधिकारी, सभासद बंदमध्ये सहभागी झाले. त्यामुळे धान्य व्यापार, किराणा दुकाने, विविध वस्तूंची शोरुम्स बंद होती. .परिणामी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, महापालिका चौक आदी परिसरात नेहमीपेक्षा गर्दी, वर्दळ कमी होती. काही ठिकाणी शुकशुकाट होता. दुपारी चारनंतर बऱ्यापैकी दुकाने पूर्ववत सुरू झाली..कोटआजच्या बंदमध्ये व्यापारी, व्यावसायिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. बंदमुळे कोल्हापुरातील सुमारे ३५० कोटींची उलाढाल ठप्प झाली. दोन आठवड्यांत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स.चौकटपणन विभागाने बोलविली सोमवारी बैठकव्यापारी-व्यावसायिकांनी राज्यभर केलेल्या आंदोलनाची दखल पणन, सहकार व वस्त्रोद्योग विभागाने घेतली आहे. या विभागाने पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ८) नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात व्यापारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलाविली असल्याची माहिती कोल्हापूर चेंबरचे सचिव अजित कोठारी यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.