
कोल्हापुरात ‘जीएसटी’ कमी न करताच वस्तूंची विक्री, ग्राहकांची लूट
esakal
Kolhapur Collector : केंद्र सरकारने अलीकडेच काही जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरात कपात केली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील बहुतांश व्यापाऱ्यांनी जुन्याच दराने वस्तूंची विक्री सुरू ठेवली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल होत असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे चित्र आहे. ऐन दिवाळी सणाच्या धामधुमीत असे प्रकार घडत असल्याबाबत अनेक तक्रारी ग्राहक संरक्षण परिषदेकडे आल्या आहेत. त्यावर मंगळवारी (ता. २८) ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. लोणी, तूप, चीज, बदाम, बिस्किट, टूथपेस्ट, दूध पावडर, ए. सी., सोलर कुकर आदी वस्तूंवर दर कपात लागू करण्यात आली.