

Heavy traffic congestion in Kolhapur
sakal
कोल्हापूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, धोक्यात येणारा सुरक्षित प्रवास वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी विविध पर्याय आणि उपाययोजना सुचविल्या आहेत; मात्र हे उपाय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महापालिकेचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे.