Kolhapur Shocking News : गटारीत बुडणाऱ्या छोट्या भावाला, वाचविताना मोठ्या भावाचा मृत्यू; कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Kolhapur Tragedy : पाठीला दप्तर असल्याने दोघे अडकून पडले. केवळ तोंड पाण्याबाहेर असल्याने दोघे श्वास घेत ओरडत होते. शिवतेज तरुण मंडळाचे कार्यकर्ते जमले. त्यांनी एका बाजूने पाण्याचा प्रवाह वाचविण्याच प्रयत्न सुरू केला.
Kolhapur Shocking News

Kolhapur Shocking News

Esakal

Updated on
Summary
  1. घटना – फुलेवाडी रिंगरोडवरील अहिल्यादेवी होळकरनगरात ९ वर्षीय जॉन कांबळे गटारीत कोसळला; त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ केदार (११) याने गटारीत उडी घेतली.

  2. राहिलेले प्रयत्न – शिवतेज तरुण मंडळाचे कार्यकर्ते व अग्निशमन दलाने तातडीने प्रयत्न करून दोघांना बाहेर काढले; मात्र केदारचा उपचाराआधीच मृत्यू झाला, तर जॉनला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

  3. प्रतिक्रिया – घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांचा आक्रोश झाला; स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे एका मुलाचा जीव वाचविण्यात यश आले.

Drain Accident Kolhapur : शिकवणीहून घरी परतताना लहान भाऊ पाय घसरून साडेतीन फूट खोल गटारीत कोसळला. पावसामुळे खळाळत वाहणाऱ्या गटारीतून हाहा म्हणता लहान भाऊ वाहत निघाला. सोबत असलेला मोठा भाऊ केदार ऊर्फ जुएल मारुती कांबळे (वय ११) याने क्षणार्धात गटारीत उडी घेतली. प्रवाहासोबत दोघेही ३० ते ३५ फूट वाहत जाऊन चेंबरखाली एका पाण्याच्या पाईपला अडकून पडले. ओरडण्याचा आवाज ऐकताच स्थानिक तरुण, अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून दोघांना बाहेर काढले. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने केदार कांबळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर जॉन मारुती कांबळे (वय ९) याला वाचविण्यात यश आले. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास फुलेवाडी रिंगरोडवरील अहिल्यादेवी होळकरनगरात ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com