
Kolhapur News : हमिदवाडा येथे मुरगूड-निपाणी मार्गानजीक नव्याने बांधण्यात येणाऱ्या घराची भिंत कोसळून भिंतीजवळ बसलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सुलोचना मधुकर कुंभार (मूळ गाव सुरुपली, ता. कागल) या ठार झाल्या; तर पूजा भरत कांबळे ही महिला गंभीर जखमी झाली. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.