Kolhapur Building Slab Collapse : कालची रात्र भयानक, सहकाऱ्यांना वाचवा... त्यांना बाहेर काढा; घटनास्थळावर बांधकाम कामगार महिलांचा हंबरडा

Kolhapur fire brigade new building : ‘आमच्या सहकाऱ्यांना वाचवा... त्यांना बाहेर काढा...’ अश्रू भरल्या डोळ्यांनी आणि थरथरणाऱ्या आवाजात बांधकाम कामगार महिलांनी हंबरडा फोडला.
Kolhapur Building Slab Collapse

Kolhapur Building Slab Collapse

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्दे (Highlights)

स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना – फुलेवाडी फायर स्टेशनजवळ नव्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, परिसरात भीती व गोंधळ पसरला.

महिलांचा आक्रोश – सहकारी अडकले असल्याने कामगार महिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी "त्यांना वाचवा" अशी हाक मारत हंबरडा फोडला, तर काही महिला बेशुद्ध पडल्या.

स्थानिक व बचावपथकाचे धाडस – स्थानिक नागरिक, मंडळातील तरुण, फायर ब्रिगेड व पोलिसांनी जीव धोक्यात घालून ढिगाऱ्यातून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Kolhapur Accident Latest Updates : ‘आमच्या सहकाऱ्यांना वाचवा... त्यांना बाहेर काढा...’ अश्रू भरल्या डोळ्यांनी आणि थरथरणाऱ्या आवाजात बांधकाम कामगार महिलांनी हंबरडा फोडला. फुलेवाडी फायर स्टेशनजवळ सुरू असलेल्या नव्या बांधकाम इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. यात काही बांधकाम कामगार अडकले. काहींना बाहेर काढले. या संपूर्ण घटनेने परिसरात सर्वत्र भी‍ती, चिंता आणि बांधकाम कामगार महिलांच्या आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com