कोल्हापूर : बेरोजगार जगण्याला लाभले बळ

ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीच्या कोंबडीच्या व्यवसायात रोजगाराची संधी
ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीच्या कोंबडीच्या व्यवसायात रोजगाराची संधी
ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीच्या कोंबडीच्या व्यवसायात रोजगाराची संधीsakal

दोन गुंठे जागा होती, शेड मारलेले होते, रोजगार नव्हता. अशा शांतरामने मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातून ११ रुपयाला एक अंडे याप्रमाणे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीच्या कोंबडीची अंडी घेतली. दहा नर कोंबडे, तर शंभरावर कोंबड्या घेतल्या. कोंबडी व अंडी व्यवसाय सुरू केला आणि महिन्याकाठी वीस-पंचवीस हजारांचा रोजगार सहज मिळू लागला. एक चांगला व्यवसाय उभा केला आणि अशा शेकडो बेरोजगार जगण्याला बळ लाभले. अशा ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीच्या कोंबडीच्या व्यवसायात रोजगाराची भक्कम संधी आहे.

प्रशिक्षण, उद्योग अन् महसूल

लाईन बझार रोडवरील पशुसंवर्धन विभागाच्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रात नवीन जातीच्या कोंबडींचे संशोधन तसेच अंडी उबवणी यावर काम चालते. येथे व्यावसायिक वापरासाठी अंडी किंवा कोंबड्या दिल्या जातात. ज्यांना नव्याने व्यवसाय करायचा आहे, अशांना केवळ दोनशे रुपये भरून दोन महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाते. या बळावर पाच वर्षांत दीड हजार लोकांनी प्रशिक्षण घेतले, तर अनेकांनी व्यवसाय सुरू केला. कमीत कमी शंभर ते पाच हजार कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करता येतो. बहुतांशी जण कोंबडीचे पिल्लू तयार करण्यासाठी अंडी विकत घेतात किंवा काहीजण थेट पिल्लूच विकत घेतात. त्या अंड्यांची पिल्ले मोठी होतील तशी अंडी मिळू लागतात. या अंड्यांची विक्री सात रुपये एक याप्रमाणे केली जाते. दिवसाला ५० ते साडेतीन हजारांवर अंडी विकून अनेकजण व्यवसाय यशस्वी रितीने साधत आहेत. या साऱ्यात अंडी विक्रीतून अंडी उबवणी केंद्राला वर्षाकाठी कमीत कमी सरासरी ७५ लाखांचा महसूल मिळतो. या महसुलाचा वापर नवीन कोंबडी नियमित व संगोपनासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी केला जातो.

संगोपन, अंडी व चिकन विक्री

कोंबडी संगोपनासाठी पोल्ट्रीसाठीचे शेड, खाद्यासाठीची भांडी, पाणी व खाद्य सुविधा केल्या जातात. अशा पोल्ट्रीसाठी २० रुपयाला एक याप्रमाणे कोंबडी पिल्ले घेतली जातात. ११ रुपयाला एक अंडे याप्रमाणे अंडी घेऊन उबवणीसाठी ठेवता येतात. शासनाच्या नियमानुसार ९ ते १० कोंबडींमागे एक नर कोंबडा घेतला जातो.

अंडीतून पिल्ले तयार झाली किंवा तयारच घेतलेल्या पिल्लांना खाद्य घालून पुरेशी निगा राखल्यास १९ आठवड्यांत अंडी देणे सुरू होते. एक कोंबडी एकूण ७२ आठवड्यांत १२० ते २८० अंडी देते. साधारण ५५ ग्रॅमचे हे अंडे आहे. अशी अंडी विक्री केली जातात तसेच साधारण दीड महिन्यात कोंबडी मोठी होते. मांसल भागही वाढतो ते चिकन म्हणून विक्री केले जाते.

हे लक्षात घ्या...

  • गेल्या सहा महिन्यांत चिकनचे भाव वाढले

  • ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोंबडीचा भावही २५० पर्यंत

  • चिकन अंड्याची मागणी बारमाही राहणार

  • कोंबड्यांना वेळीच लसीकरण केल्यास,

  • निगा राखल्यास आजारपण किंवा अंडी,

  • मांस कमी होणे अशी शक्यता कमी

  • एक व्यक्ती करू शकते ५००० कोंबड्यांचे संगोपन

  • फारसे मनुष्यबळ लागत नाही

  • कुक्कटपालनावर शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके

  • त्या आधारे छोट्या प्रमाणात जोड व्यवसाय करू शकता

थोडीफार पायाभूत सुविधा आहे, अशांना अंडी उबवणी केंद्रातील पिल्ले, कोंबडी, कोंबडा घेऊन व्यवसाय सुरू करता येईल. यापूर्वी ज्यांनी असे प्रयत्न केले, व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले त्यांच्या व्यवसायाला यश आले आहे; मात्र व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षण घेतले तर त्याचा चांगला लाभ होतो हेही दिसून आले. कोल्हापूर शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक व्यावसायिक यशस्वी झाले आहेत. त्यांनी ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोंबडीचा व्यवसाय करून इतरांना प्रेरणा दिली आहे.

-अशोक नाईक, निवृत्त उपायुक्त, अंडी उबवणी केंद्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com