Kolhapur: विधान परिषदेसाठी ४१७ मतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषद

कोल्हापूर : विधान परिषदेसाठी ४१७ मतदार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक वगळून होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४२० मतदार आहेत. तथापि जिल्हा परिषदेतील एका सदस्याचे निधन, तर एक सदस्य अपात्र आहे, तर पन्हाळा नगरपालिकेतील एका स्वीकृत नगरसेवकाचे निधन झाल्याने ही मतदार संख्या ४१७ होईल. उद्या आद्याक्षरांच्या क्रमानुसार ही यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे.

या निवडणुकीसाठी महापालिकेतील ८१ नगरसेवकांचे मतदान नसले, तरी जिल्ह्यात नव्याने झालेल्या पाच नगरपालिकेतील निवडून आलेले नगरसेवक, नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक, असे ९९ सदस्य मतदानासाठी पात्र आहेत.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषदेच्या कोल्हापुरातील जागेसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. १६ नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी अर्ज भरले जाणार आहेत. एकीकडे राजकीय हालचाली गतिमान झाल्या असतानाच प्रशासनाच्या पातळीवरही या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या तयारीचा भाग म्हणून मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ही यादी तयार आहे, पण आयोगाने आद्याक्षरांच्या क्रमानुसार ती तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याप्रमाणे यादी तयार करून उद्या (ता. १२) आयोगाकडे सादर केली जाणार आहे. यात जिल्हा परिषद सदस्य, १४ नगरपालिकांचे नगरसेवक व पंचायत समितीच्या १२ सभापतींचा समावेश असेल. निवडणुकीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ११, तर शहरात करवीर तालुक्यातील मतदारांसाठी एक, अशी मिळून १२ केंद्रे निश्‍चित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

दृष्टिक्षेपात मतदार असे

जिल्हा परिषद ६५

पंचायत समिती सभापती १२

इचलकरंजी नगरपालिका ६७

जयसिंगपूर २८

मलकापूर २०

पेठवडगाव २०

मुरगूड २०

पन्हाळा १९

गडहिंग्लज २२

कागल २३

कुरूंदवाड २०

आजरा २०

चंदगड २०

हुपरी २१

शिरोळ १९

हातकणंगले १९

loading image
go to top