

Kolhapur political analysis Vinay Kore
esakal
Kolhapur Election Political Analysis : कोल्हापूर जिल्ह्यात दोन आमदार असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने शेवटच्या टप्प्यात रिंगणात उडी घेतली. महायुतीने सहकार्य केले नाही म्हणून आरपीआय आठवले आणि कवाडे गटाला सोबत घेऊन तीस जागांवर निवडणूक लढवली. यामध्ये प्रभाग दहामध्ये अक्षय जरग यांनी विजयी होऊन भोपळा फोडला. आपला उमेदवार विजयी होण्यापेक्षा इतर पक्षातील कोणाला विजयी करायचे आणि कोणाला पराभूत हे मात्र जनसुराज्य शक्ती पक्षाने ठरविल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे ती ‘बी टीम’च ठरली.