

कोल्हापूर : चुकीच्या प्रभागात गेलेल्या नावांबाबत आज ५१ हरकती दाखल झाल्या. आज ८३ हरकती आल्या असून गांधी मैदान विभागीय कार्यालयात त्यापैकी ६० हरकती आल्या आहेत. त्यामुळे एकूण ५६८ हरकती झाल्या असून प्रत्येक विभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन हरकतींची तपासणी करत आहेत.