Kolhapur Sewage : वाढती लोकसंख्या, जुनी यंत्रणा आणि अपुरे प्रकल्प; कोल्हापूरचे सांडपाणी संकट कधी सुटणार?
Rising Population Increase : ४९ एमएलडी सांडपाणी अजूनही अप्रक्रियित; शंभर टक्के प्रक्रियेचे उद्दिष्ट केवळ कागदावर. उपनगरांपासून जुन्या पेठांपर्यंत सांडपाणी व्यवस्थेची कोंडी कायम. नवे प्रकल्प, पुनर्वापर आणि कठोर अंमलबजावणीशिवाय शहर स्वच्छ होणार नाही
कोल्हापूर : शहरातील सांडपाण्याचा प्रश्न वर्षांनुवर्षे तसाच आहे. प्रशासनाने काही वर्षांत सांडपाण्याच्या जलवाहिन्या बदलणे, उपनगरांत नवीन जलवाहिनी टाकणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढवणे अशी अनेक कामे केली.