Ward 14 Municipal Election
sakal
कोल्हापूर
Kolhapur Politics : कोल्हापूरच्या मध्यवर्ती प्रभाग १४ मध्ये दिग्गज आमनेसामने; इच्छुकांच्या गर्दीने निवडणूक तापली
Ward 14 Municipal Election : चार प्रभागांचे एकत्रीकरण, लोकसभा-विधानसभा निकालांचा प्रभाव आणि वाढती इच्छुकांची संख्या यामुळे प्रभाग १४ मधील राजकीय समीकरणे बदलत आहेत.
कोल्हापूर : शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये इच्छुकांची गर्दी झाल्याने चांगलीच चुरस वाढली आहे. पक्षाची उमेदवारी मिळण्याची वाट न बघता त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजी नगरसेवक, सामाजिक आणि तरुण कार्यकर्त्यांनी या प्रभागातून रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे.

