

Water Conference
sakal
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांत महापालिकेने ५०० कोटींची पाणीपट्टी वसूल केली असली, तरी जलसंपदा विभागाची थकबाकी का भरली नाही? असा सवाल करत, पाणीपुरवठ्याचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधींसोबत महापालिका चौकात पाणी परिषद घ्यावी, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने आज केली. १६१ कोटींच्या थकबाकीमुळे जलसंपदा विभागाने महापालिकेची तीन उपसा केंद्रे बंद करून पाणीपुरवठा बंद पाडला होता.