esakal | 'फये' प्रकल्पाच्या 'गळतीमुळे' जनतेचा जीव टांगणीला
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

'फये' प्रकल्पाच्या 'गळतीमुळे' जनतेचा जीव टांगणीला

sakal_logo
By
अरविंद सुतार

कोनवडे : 'मेघोली' लघुप्रकल्पाच्या मुख्य भिंतीला भगदाड पडून प्रकल्प फुटून मोठे नुकसान झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर 'फये' प्रकल्पाला लागलेल्या गळतीचा प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जलसंधारण विभागाचे आतातरी डोळे उघडणार काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारे तलाव बुधवारी (ता. २) रात्री दहाच्या दरम्यान फुटून शेकडो हेक्टर शेती होत्याची नव्हती झाली व शेतकरी देशोधडीला लागला तर एका महीलेसह जनावरांनाही निद्रिस्त, बेजबाबदार प्रशासनामुळे आपला जीव गमावावा लागला. मिणचे, हेदवडे परिसराला वरदान ठरलेल्या 'फये' प्रकल्पाच्या व्हॉल्वला निकृष्ट कामामुळे गळती पाचवीला पुजली आहे. हा प्रकल्प मिणचे, हेदवडे खोरीतील अनेक गावांना हा वरदान ठरला आहे. पण प्रकल्पाच्या व्हॉल्वला प्रचंड गळती आहे. मुख्य व्हॉल्वमधून मोठी गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जाते.

हेही वाचा: घरकुलांसाठीच्या अनुदानात एक लाख रुपायांची वाढ करू : अजित पवार

सध्या या धरणात पाणी साठा १.७७ दशलक्ष घनमीटर असुन धरण हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. धरणाची गळती काढण्यासाठी ग्रामस्थानी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. पण याबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने तलावाखाली असणारी गावे 'मेघोली' घटनेने भीतीच्या छायेखाली आहेत. फये प्रकल्पावर एकही कर्मचारी नसल्याने प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा रामभरोसे आहे.

शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी १९९८ साली 'फये' येथे पायाखुदाईस सुरवात झाली. पायाखुदाई पासूनच या प्रकल्पाचे काम वादग्रस्त ठरले. प्रकल्पाची उंची ३३.४२ मी., लांबी ३५५.६५ मी., साठवणूक क्षमता १३८.८८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पाचे ९७२ हे. लाभक्षेत्र असून ७०० हे. सिंचन क्षेत्र आहे.

एकंदरीत लघुपाटबंधारे प्रकल्प जनतेच्या मुळावर उठणारे ठरत आहेत. प्रशासन लोकांचा जीव गेल्यावर जागे होणार का ? असा सवाल तालुक्यातील भेदरलेल्या नागरिकांमधून होत आहे.

loading image
go to top