Amal Mahadik : कोल्हापुरकरांच्या पाण्यासाठी अमल महाडिक अॅक्शन मोडवर, मुख्यमंत्र्यांसोबत थेट बैठकीचे नियोजन

Kolhapur Water Shortage : सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शहराची थेट पाईपलाईन योजना बंद पडत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ते अडथळे दूर करून नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याची गरज आहे.
Amal Mahadik
Amal Mahadikesakal
Updated on

Kolhapur City Drinking Water Problem : सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शहराची थेट पाईपलाईन योजना बंद पडत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ते अडथळे दूर करून नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत दहा दिवसांत तातडीची बैठक होणार आहे. त्यात विविध प्रस्तावांच्या कृती आराखड्याचे सादरीकरण केले जाईल. त्यातून निधी मंजूर करून हे प्रश्‍न कायमचे संपवले जातील, असे आमदार अमल महाडिक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.त्यांनी बुधवारी दुपारी योजनेतील नादुरुस्तीची धरणस्थळावर जाऊन पाहणी केली. महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावांची माहिती घेतली. त्यानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘सतत होणाऱ्या नादुरुस्तीने होणाऱ्या गैरसोयीसाठी आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी ही केंद्रे पर्यायी व्यवस्था म्हणून सुसज्ज करायची गरज आहे. भुयारी वीजवाहिनीच्या कामाचीही गरज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उपाययोजनांसाठी बैठक घेण्याचे मान्य केले आहे. ‘थेट’चे चार पंप असून तीन कार्यरत आहेत. एक पर्यायी असतो. गरज लक्षात घेऊन आणखी दोन पंप, त्यासाठी स्वतंत्र वीज पॅनेल, असा ११ कोटींचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जल अभियंता हर्षजित घाटगे यांना दिल्या. योजनेच्या भूमिगत वीज वाहिनीसाठी १६ कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.

या दीर्घकालीन पर्यायांबरोबरच सॉफ्टवेअर, पंप, वीजवाहिनी अशा विविध यंत्रणांत ऐनवेळी बिघाड झाल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी पर्यायी साहित्य नेहमी विभागाकडे उपलब्ध असले पाहिजे. त्याचीही मांडणी आराखड्यात केली जाणार आहे. संबंधित कंपनीकडे पाच वर्षे योजना चालवण्याची, देखभालीची जबाबदारी आहे. अडीच वर्षे गेली असून, अधिकारी तसेच कर्मचारी नेमून त्यांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन केले पाहिजे. या साऱ्यांसाठी आवश्‍यक निधी आणला जाणार आहे. याबरोबरच शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उड्डाणपूल, रिंगरोड या प्रकल्पांवरही लक्ष दिले जात आहे. निविदा प्रक्रिया होऊन आराखडे तयार केले जाणार आहेत.

त्रुटी शोधणार

थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी शोधून त्याचा अहवाल महापालिका तयार करत आहे. विविध टप्प्यांवर येणारे तांत्रिक अडथळे, पाईपलाईनची गळती, दुरुस्तीला लागणारा वेळ या साऱ्यांचा अहवाल प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मागवला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी तो घेऊन त्याचीही चर्चा बैठकीत केली जाणार आहे, असे आमदार महाडिक यांनी सांगितले.

या उपाययोजनांचा अंतर्भाव

० स्वतंत्र दोन पंप व विजेचे पॅनेल

० अखंडित वीजपुरवठ्यासाठी भुयारी वीजवाहिनीचा १६ कोटींचा प्रस्ताव

० संपूर्ण योजनेसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची जादाची तजवीज

० योजनेसाठी आवश्‍यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

० शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी उपसा केंद्रांना ऊर्जितावस्था

ही दुर्दैवाची बाब ः मुश्रीफ

शहरात ऐन सणामध्ये पाणीबाणी ओढवली आहे. महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘कोल्हापूरवासीयांना चार-चार दिवस पाणी न मिळणे, ही दुर्दैवीच बाब आहे. काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून शाश्वत पाणी पुरवठा कसा होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. यासाठी कितीही लागेल तो निधी उपलब्ध करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com