Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका
Kolhapur Water Supply : कोल्हापूरात पाणीपुरवठा अचानक बंद केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्णयावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “चर्चेविना अशी कारवाई चुकीची” असल्याचे स्पष्ट केले.
कोल्हापूर : पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक सेवा असताना तीच अचानक बंद करून शहरवासीयांना वेठीस धरण्याच्या कारवाईवरून आज महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.