
Weather Update
esakal
Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील वातावरणात शुक्रवारी सकाळपासूनच बदल जाणवू लागला. दुपारपर्यंत कडकडीत ऊन पडले. त्यानंतर अचानक दुपारी शहराच्या काही भागांत व उपनगरांत ढगफुटीसदृश पावसाने अक्षरश: झोडपून काढले. शहरातील मंगळवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, महापालिका परिसर, छत्रपती शिवाजी चौक, संभाजीनगर, आपटेनगर, वाशी, कळंबा, पाचगाव, आर. के. नगर, मोरेवाडी, कणेरी अशा अनेक भागांत हा पाऊस झाला. यामुळे गेल्या चार दिवसांपासून पाऊस नसल्याने सुखलेले रस्ते शुक्रवारी पुन्हा ओले होऊन चिखलमय झाले. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोल्हापूरसह परिसरात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.