

kolhapur woman harassment for male child
esakal
Domestic Violence Kolhapur : वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजे, सुनेने घरी राहू नये म्हणून सासरे आणि नणंद यांच्याकडून मारहाण, छळ होत असल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आज दाखल झाली. तनुजा अभिषेक पुणेकर (३२, रा. रंकाळा टॉवर परिसर) यांनी ही फिर्याद दिली. त्यानुसार सासरे सुरेश बापूसाहेब पुणेकर (७२, रा. रंकाळा टॉवर परिसर) आणि नणंद श्वेता संजय कुडाळ (४६, रा. बाजारपेठ गेणुप्रसाद कॉम्प्लेक्स, कुडाळ जि. सिंधुदुर्ग) यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.